दहा हजारांपेक्षाही कमी किंमतीचे तीन 4जी स्मार्टफोन लाँच

panasonic
मुंबई: एल्युगा एल२, एल्युगा आय२ आणि टी४५ हे तीन स्मार्टफोन मोबाइल कंपनी पॅनासॉनिकने लाँच केले आहेत.

अँड्रॉईड लॉलीपॉप ५.० ऑपरेटिंग सिस्टमवर हे तीनही स्मार्टफोन आधारित असून हे ४जी सपोर्ट आहेत. तूर्तास तरी कंपनीने या स्मार्टफोनच्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

१० हजारांच्या आत या तिन्ही स्मार्टफोनची किंमत असून पॅनासॉनिक एल्युगा एल२ ची किंमत रु. ९९९०, पॅनासॉनिक एल्युगा आय२ ची किंमत रु. ८२९० आणि पॅनासॉनिक टी४५ ची किंमत रु. ६९०० इतकी आहे.

Leave a Comment