जगातले पहिले स्पेस लिफ्ट कॅनडात

lift
पृथ्वीवरून लिफ्टच्या सहाय्याने अंतराळ यात्रा करण्याचे दिवस आता फार दूर राहिलेले नाहीत. कॅनडा स्पेस एजन्सीने जगातली पहिली स्पेस लिफ्ट बनविली असून त्यासाठी अमेरिकी पेटंटही मिळविले आहे. ही लिफ्ट २० किमी उंच म्हणजे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षाही २० पट उंचीची आहे. थोट टेक्नॉलॉजी ने या लिफ्टचा आराखडा तयार केला आहे.

लिफ्ट तयार करण्यात महत्वाची भूमिका असलेले डॉ. ब्रँडन क्युईन यांच्या म्हणण्यानुसार यामुळे अंतराळात रॉकेट इंधनासाठी येणार्‍या खर्चात किमान ३० टक्के बचत होऊ शकणार आहे तसेच लिफ्ट वारंवार वापरता येऊ शकणार आहे. २० किमी उंचीवर फ्री स्टँडींग टॉवर असून अंतराळवीर लिफ्टच्या सहाय्याने या टॉवरपर्यंत जाऊ शकतील आणि टॉवरवरून स्पेस क्राफ्टच्या सहाय्याने अंतराळात झेप घेऊ शकतील. या टॉवरवरच स्पेस क्राफ्ट रिफ्यूलिंग सुविधाही आहे.

थोट टेक्नॉलॉजीच्या सीईओ कॅरोलिन रॉबर्टस यांच्या मते स्पेस टॉवरमध्ये सेल्फ लँडींग टेक्नॉलॉचीचा वापर ही अंतराळ प्रवासाच्या नव्या युगाची सुरवात म्हणावी लागेल. ज्यांना अंतराळात प्रवास करायचा आहे अशी कुणीही व्यक्ती या १२ मैल म्हणजे २० किमी उंचीच्या टॉवरवरून स्पेस फ्लाईट घेऊ शकेल.

Leave a Comment