चीनमध्ये संस्कृत वर्गासाठी ६० विद्वानांनी केली नोंदणी

sanskrit
कम्युनिस्ट चीनची नवी पिढी भारताची देवभाषा अथवा गीर्वाण वाणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या संस्कृत भाषेला पसंती देऊ लागले असल्याचे दिसून येत आहे. बुद्धीस्ट इन्स्टिट्यूटतर्फे घेतल्या जाणार्‍या उन्हाळी कँप मध्ये ही भाषा शिकण्यासाठी ६० जणांनी नोंदणी केली आहे. आलेल्या ३०० अर्जातून या ६० जणांची निवड केली गेली असून हे सर्वजण आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेले विद्वान, उद्योजक, व्यावसायिक आहेत. त्यात योगशिक्षक, मॅकॅनिकल डिझायनर, परफॉर्मर, हॉटेल मॅनेजमेंट, पर्यावरण संरक्षक या क्षेत्रातील नामवंताचा समावेश आहे.

या संस्थतर्फे सहा दिवसांचा संस्कृत भाषा कोर्स घेतला जाणार आहे. त्यात लिहिणे व वाचण्यास अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. शिक्षक म्हणून नेमले गेलेले जर्मन विद्यापीठातील पीएचडी मिळविलेले ली वी म्हणाले, संस्कृतचे व्याकरण अवघड आहे. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाल्यानंतर संस्कृत शिकण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. पिकिंग विद्यापीठात संस्कृतसाठी वेगळा विभाग स्थापला गेला आहे.

वास्तविक चीनमध्ये संस्कृतचा प्रसार सहाव्या शतकापासूनच झाला आहे. तेथील जुआन जांग हा बौद्ध भिक्कू भारत भेटीवर या काळात आला होता आणि भारतातच १७ वर्षे राहिला होता. त्याने संस्कृत चीनमध्ये नेले असे मानले जाते. त्यानंतर अनेक भिक्कुंनी भारताच्या प्राचीन चिकित्सा पद्धतीचे अध्ययन करण्यासाठी संस्कृतचा आधार घेतला होता असेही सांगितले जाते.

Leave a Comment