मक्याचे दर भडकले

maka
पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून मागणीत वाढ झाल्याने मक्याचे दर भडकले असून ही दरवाढ नवीन पीक बाजारात येईपर्यंत म्हणजे आक्टोबरपर्यंत अशीच सुरू राहील असे सांगितले जात आहे. त्यात मक्याचे उत्पादन यंदा कमी होणार असल्याचे दर उतरण्याची शक्यता नाही असेही सांगितले जात आहे. सध्या शिल्लक साठ्यातूनच मका बाजारात येत आहे त्यामुळेही पुरवठा कमी आहे आणि दरवाढीला चालना मिळते आहे.

सांगली बाजारात जुलैत प्रतिटन १४ हजारांने मिळणारा मका आता १६१०० रूपयांवर गेला आहे. चिकनच्या वाढत्या मागणीमुळे पोल्ट्री कडून मक्यासाठी मोठी मागणी आहे. कर्नाटकात पाऊस नसल्याने मका पीक धोक्यात आले आहे.वेंकीज कंपनीतील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार चिकन विक्रीत १० टक्के वाढ झाली असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांकडून मक्याची मागणी वाढली आहे. त्यांना साधारण १ कोटी टन मक्याची गरज आहे. ऑल इंडिया स्टार्च मॅन्युफॅक्चरिंगचे अध्यक्ष ई.के. सरदाना यांनीही मका दरवाढीमुळे उत्पादकांचा नफा घसरला असल्याचे सांगितले आहे. यंदाच्या सीझनमध्ये मक्याचे उत्पादन ५ लाख टनांनी घटेल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. परिणामी मक्याचे चढे दर कमी होण्याची शक्यता मावळत असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment