ऑडीची आरएस सेव्हन स्पोर्टबॅक कार

audy
जर्मन कार उत्पादक कंपनी ऑडीने त्यांची नवी ऑडी आर सेव्हन स्पोर्टसबॅक कार बाजारात उतरविली आहे. ही सेदान अन्य सेदानपेक्षा अनेक अर्थांनी वेगळी आहे. मुख्य म्हणजे ० ते १०० किमीचा स्पीड घेण्यासाठी या कारला अवघी ३.९ सेकंद लागतात. म्हणजे डोळ्याची पापणी लवेपर्यंतच ही कार आपल्या नजरेसमोरून दूर जाते. त्यासाठी तिला ४ लिटरचे व्ही एट बीस्ट इंजिनची पॉवर दिली गेली आहे. गाडीचा टॉप स्पीड आहे ३०५ किमी.

कारची गिअर सिस्टीम अतिशय स्मूथ आहे शिवाय ड्राईव्ह मोड निवडण्याची सुविधाही दिली गेली आहे. त्यानुसार आरामदायी, ऑटो डायनामिक किंवा आपल्या वैयक्तीक गरजेनुसार ड्राईव्ह मोड निवडता येतो. डायनामिक मोडमध्ये शहरातील ऐन गर्दीतही कोणत्याही स्ट्रेस शिवाय ड्राईव्ह करता येते. कारला स्लीक फुल एलईडी हेडलँप आहेत आणि इंटेरियर अतिशय देखणे केले गेले आहे. चार सीटच्या या कारला जादा बॅगेज स्पेस मात्र नाही. या कारची किंमत आहे १ कोटी २९ लाख रूपये.