नवी दिल्ली : पुढील महिन्यात अॅपल स्वस्त आयफोनची सिरीज बाजारात उतरवत असून याबाबतचे ट्विट अनेक वेळा सर्वात मोठे खुलासा करणारे ईव्हान ब्लास यांनी केले आहे.
सप्टेंबर महिन्यात येणार अॅपलचा सर्वात स्वस्त आयफोन!
जनरेशन नेक्स्ट अॅपल टीव्ही, आय फोन ६ चे नवीन व्हर्जन तसेच आयपॅड अमेरिकन कंपनी अॅपल लॉन्च करणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या एका शानदार सोहळ्यात हे लॉन्चिंग होणार आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९ सप्टेंबरला होणाऱ्या या शानदार समारंभात अॅपल आपला सर्वात स्वस्त फोन लॉन्च करणार आहे.
आयफोन ५सी च्या यशानंतर कंपनी आयफोन ६सी लॉन्च करणार आहे. तो आयफोन ५सी पेक्षा स्वस्त असणार असल्याचे ट्विट ईव्हान ब्लास यांनी केले आहे. यापूर्वी ट्विटरवरून इव्हान ब्लास यांनी ट्विट केले होते की, आयफोन ६एस, ६एस प्लस आणि ६सी एकत्र लॉन्च करणार असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर अॅपलने तसेच केल्यामुळे आता या ट्विटवरही विश्वास ठेवला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. याचा डिस्प्ले ४ इंचाचा असेल असे म्हटले आहे. आता ही अफवा आहे की सत्य हे पाहण्यासाठी आपल्याला ९ सप्टेंबरची वाट पाहवी लागणार आहे.