रेव्हेन्यू स्टँपची पीएफ काढण्यासाठी गरज नाही

epfo
नवी दिल्ली – पीएफ काढण्याच्या फॉर्मवर लागणारा एक रुपयाचा रेव्हेन्यू स्टँपची सक्ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) रद्द केल्यामुळे दरवर्षी येणा-या अडचणीतून लाखो पीएफ सदस्यांची सुटका झाली आहे.

पीएफचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी ‘ईपीएफओ’कडून प्रयत्न केले जात आहेत. नुकतीच ईपीएफओने पीएफ काढण्यासाठी भराव्या लागणा-या फॉर्मवर एक रुपयाचे रेव्हेन्यू स्टँपची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी या स्टँपमुळे सदस्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. यातून त्यांची आता सुटका होणार असल्याचे श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी म्हटले आहे.

कायदा आणि न्याय खात्याबरोबर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. त्यांनी नेफ्टच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी रेव्हेन्यू स्टँपची आवश्यकता नसल्याचे मत कायदा आणि न्याय खात्याने नोंदवले होते.

Leave a Comment