सॅमसंग गॅलेक्सी नोट ५ व एस सिक्स एज प्लस सादर

galaxy
सॅमसंगने बाजारात घसरणीला लागलेला आपला हिस्सा परत काबीज करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून न्यूयॉर्क येथे गुरूवारी झालेल्या कंपनी इव्हेंटमध्ये आपले दोन नवे फॅब्लेट सादर केले आहेत. प्रेसिडेंट व सीई्रओ जे. के. शिन यांच्या हस्ते हे दोन्ही फोन सादर करण्यात आले.

गॅलेक्सी एस सिक्स एज प्लस व नोट फाईव्ह पूर्वीप्रमाणेच ड्युअल डिस्प्लेसह आहेत. नोट फाईव्हला नवीन व पहिल्या मॉडेलपेक्षा अधिक चांगले एस पेन दिले गेले आहे. अँड्राईड लॉलीपॉप ५.१.१ ओएस. नोट फाईव्ह साठी ५.७ इंची सुपर एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. दोन्हीसाठी ४ जीबी रॅम, १६ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ३२ व ६४ जीबी मेमरी दिली गेली आहे. मात्र या फोनची बॅटरी हँडसेटपासून वेगळी करता येणार नाही.

Leave a Comment