नोकियाचे २०१६ त पुनरागमन

nokia
मोबाईल क्षेत्रात कांही काळ जनमानसात पहिली पसंती आणि विश्वासाचे स्थान मिळविलेली नोकिया सध्या बाजाराबाहेर असली तरी पुढील वर्षात ही कंपनी हँडसेट बाजारात नव्या दमाने उतरणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. ३० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या कंपनीचे अस्तित्व मायक्रोसॉफ्टने तिची २०१४ साली खरेदी केल्यानंतर संपुष्टात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार फिनलंडची ही कंपनी त्यांचे इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञांनी मोबाईल कंपन्यांच्या बादशाह म्हणता येईल अशा स्थितीत आणली होती. एकेकाळी मोबाईल म्हणजे नोकिया आणि नोकिया म्हणजे मोबाईल अशी तिची ओळख होती. आता परत एकदा कंपनीचे इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञ कंपनीला गतवैभव मिळवून देण्यासाठी सज्ज झाले असून ते हँडसेंट डिझाईन व लायसेंसिगची योजना आखत आहेत. अर्थात यासाठी त्यांना मायक्रोसॉफ्टकडून हिरवा कंदिल दाखविला जाणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीचे सीईओ राजीव सुरी एका जर्मन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की आम्ही आमच्या उपयोगी येईल अशा एखाद्या भागीदाराच्या शोधात आहोत. मायक्रोसॉफ्ट आमच्याच डिझाईननुसार फोन बनवत आहे. आम्ही आधी डिझाईन आणि नंतर लायसेन्ससाठी ब्रँड नेम देण्याच्या विचारात आहोत.

नोकियाने जगात सर्वात प्रथम स्मार्ट, वापरायला सोपे, दीर्घकाळ बॅटरी लाईफ असलेले आणि तुलनेने स्वस्त मोबाईल्स बाजारात आणले होते आणि त्यांची गुणवत्ताही उत्तम दर्जाची होती. इतकेच नव्हे तर नोकियाच्या हँडसेटमुळेच भारतीय मोबाईल बाजारात बदल घडवून आणण्याची कामगिरीही बजावली होती.

Leave a Comment