ट्विटरने हटवली १४० शब्दांची मर्यादा

twitter
नवी दिल्ली- वैयक्तिक मेसेज पाठवण्यासाठी असलेली १४० शब्दांची मर्यादा लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने हटवली असून त्यामुळे आता ट्विटरवरून कितीही मोठा मेसेज पाठवता येणार आहे. तर ट्विट करण्यासाठी असलेली १४० शब्दांची मर्यादा मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

१४० शब्दांचे याआधी मेसेज पाठवावे लागत असल्याने चॅटिंगवर मर्यादा येत असल्यामुळे ही शब्दमर्यादा उठवावी, अशी ट्विटरप्रेमींची मागणी होती. त्यानंतर आता ही मर्यादा हटवण्यात आली असून आता आपल्याला कितीही मोठा मेसेज करता येणार आहे. या बदलामुळे नेटिझन्सनी समाधान व्यक्त केले आहे. हा बदल सध्या फक्त डेस्कटॉप, अँड्रॉईड आणि अ‍ॅपलधारकांनाच लागू करण्यात आला असून येत्या काळात सर्वासाठी ही सुविधा लागू करण्यात येणार आहे.

ट्विटर युजर्सना एखादी गोष्ट मांडायची असेल तर त्यासाठी १४० शब्दांची शब्दमर्यादा होती. अगदी मेसेजसाठी देखील १४० शब्दांची मर्यादी होती. पण ट्विटरने अधिकृत घोषणा करून डायरेक्ट मेसेज म्हणजे डीएमची मर्यादा वाढवून ती १० हजार शब्दांपर्यंत केली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी छोटासा संदेश पाठवण्यापेक्षा अगदी लांबलचक संदेश आपल्या फॉलोअर्सना पाठवू शकता.

Leave a Comment