उद्योगजगत काळ्या पैशाच्या कायद्याने अस्वस्थ

black-money
नवी दिल्ली : करदात्यांमध्ये काळ्या पैशाच्या नव्या कायद्यामुळे भीती आणि गोंधळाचे वातावरण असल्याचे टीकास्त्र औद्योगिक संघटना असोचेमने सोडले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन सरकारने यावर खुली चर्चा करून या कायद्यात आवश्यक बदल करण्याचे आवाहन या संघटनेने केले आहेत.

प्रत्येक स्तरातील करदात्यांशी केलेल्या विस्तृत चर्चेनंतर असे आढळले की त्यांच्यात काळा पैशाच्या नव्या कायद्याबाबत गोंधळ आणि भीतीचे वातावरण आहे. या कायद्याची चुकीची बाजू म्हणजे करदाते मालमत्ता उघड करण्यास धजावणार नाहीत, असे यात नमूद केले आहे.अर्थखात्याने या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. असे असले तरी यातून या कायद्याबाबतचे मत बदलण्यास फारशी मदत होत नसल्याचे यात नमूद केले आहे.सप्टेंबरनंतर अनुपालन खिडकी बंद झाल्यानंतर कर-अधिका-यांकडून छापेसत्र सुरू होण्याची भीती वाटत आहे. हे तणावमुक्त व्यवसाय वातावरण निश्चितच नाही, असेही असोचेमने नमूद केले आहे.एखाद्या क्षुल्लक चुकीवरूनही करदात्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची भीती व्यक्त होत असल्याचे असोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment