सौर उर्जेवर चालणारे देशातले पहिले कोचीन विमानतळ

kochi
पूर्णपणे सौरउर्जेच्या वापर करून कामकाज करणारे पहिले विमानतळ बनण्याचा मान केरळमधील कोचीन विमानतळाने हस्तगत केला आहे. केरळ मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या हस्ते या १२ मेगापॉवर सोलर प्रकल्पाचे उदघाटन १८ ऑगस्ट रोजी केले जात आहे.

विमानतळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.जे. कुरियन या संदर्भात माहिती देताना म्हणाले, विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्सजवळील ४५ एकर जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे. विमानतळासाठी दररोज आवश्यक असलेल्या ५० ते ६० हजार युनिट वीजेची पूर्तता या प्रकल्पातून होणार आहे. अरायव्हल टर्मिनलजवळही मार्च १३ मधे १०० किलोवॅटचे सोलर पॅनल बसविले गेले होते तसेच १ मेगापॉवरचा पीव्ही प्लँट छतावर आणि जमिनीवरील मेंटेंनन्स हँगरजवळ उभारला गेला होता. या सर्व प्रकल्पांतून पुरेशी वीज मिळणार आहे शिवाय कार्बन उर्त्सजनचे प्रमाण घटून पर्यावरण रक्षणासाठीही त्याचा उपयोग होणार आहे. परिणामी प्रदूषणावर नियंत्रण येणार आहे.