चूक दाखवणाऱ्या भारतीय इंटर्नला फेसबुकने दाखवला घरचा रस्ता

aran-khanna
वॉशिंग्टन- फेसबुकने अरन खन्ना या भारतीय तरुणास फेसबुक मॅसेंजरमध्ये असणारा एक गंभीर प्रश्न फेसबुकच्या लक्षात आणून दिल्याबद्दल त्याचे कौतुक न करता इंटर्नशिपहून काढून टाकले.

एक अप्लिकेशन अरन खन्नाने तयार केले होते त्याचे नाव मरोडर्स मॅप असे होते. या अॅपच्या साहाय्याने मेसेंजर वापरणारी व्यक्ती नेमकी कुठे आहे याचा शोध लावता येत होता. त्याने ही गोष्ट ब्लॉगद्वारे जाहीर केली. फेसबुकने त्याला त्याचे अॅप निकामी करण्यास सांगितले त्याने त्याप्रमाणे केले देखील. त्यानंतर कंपनीने नवीन मॅसेंजर डाउनलोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान हे अॅप ८५,००० जणांनी डाउनलोड केले होते. फेसबुकचे इथिकल स्टॅंडर्ड मोडल्याचे कारण दाखवून खन्नाला इंटर्नशिपहून काढण्यात आले. खन्ना हा हार्वर्ड आणि मॅसेच्युसेट्सचा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्याला दुसरीकडे तात्काळ इंटर्नशिप मिळाली. त्यानंतर त्याने त्याच्यासोबत काय झाले याचा सविस्तर वृत्तांत कथन केला. त्याचा हा वृत्तांत हार्वर्ड जर्नल ऑफ टेक्नॉलॉजिकल सायन्सेसमध्ये छापून आला आहे.

Leave a Comment