
मुंबई – कोरियातील ‘पॉस्को’ कंपनीला पर्यावरणाच्या मुद्दय़ावर ओडिसा आणि कर्नाटकमध्ये स्थानिकांच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागली होती पण आता या कंपनीचा पोलाद प्रकल्प भागीदारीत कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. प्रस्तावित जैतापूर प्रकल्पानंतर कोकणात उभा राहणारा हा मोठा प्रकल्प आहे.
दोन राज्यांतील विरोधानंतर ‘पॉस्को’चा प्रकल्प कोकणात
हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातीस सातार्डा येथे ‘उत्तम गालव्हा’ कंपनीबरोबर भागीदारीत कोरियातील पॉस्को कंपनी उभारणार आहे. हा प्रकल्प दोन हजार एकर जागेत उभा राहणार असून हा प्रकल्प सुमारे २० हजार कोटींचा आहे. प्रकल्पाकरिता पर्यावरणविषयक सर्व परवानग्या असल्याचा दावा उत्तम कंपनीने केला आहे. मात्र ओडिसात सुमारे ७० हजार कोटी गुंतवणुकीचा महाकाय प्रकल्प उभारणे पॉस्को कंपनीला अजून यश आलेले नाही. स्थानिकांच्या विरोधाने अद्यापही पर्यावरणविषयक परवानगी मिळालेली नाही. कर्नाटकातही विरोध झाल्याने या कंपनीने माघार घेतली.
