तिकीट वेटिंग, काळजी नको तरी करा रेल्वे प्रवास

indian-railway
नवी दिल्ली : अनेकवेळा वेटिंग तिकिट कन्फर्म न झाल्यामुळे पूर्ण पैसे भरूनही ताटकळत प्रवास करावा लागायचा किंवा तिकिट रद्द करावे लागायचे. पण आता ही वेळ येणार नाही. वेटिंग प्रवाशांसाठी शासनाने एक नवीन योजना आणली आहे.

तिकिट कन्फर्म झाले नाही तर प्रवाशांना त्याच तिकिटावर दुस-या रेल्वेत जागा दिली जाणार असल्यामुळे प्रवाशांना आपला प्रवास विनाकटकट पूर्ण करता येणार आहे. याबाबत रेल्वेचे अतिरिक्त संचालक प्रभास कुमार यांनी सांगितले की, या योजनेमुळे प्रवाशांना कोणताही त्रास तर होणार नाहीच पण त्याचबरोबर रेल्वेचेही उत्पन्न वाढणार आहे. या वेटिंग लिस्टवरील तिकिट कन्फर्म झाले नाही तर रद्द करावे लागते. तसेच दुसरे तिकिट आरक्षित करावे लागते. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. प्रसंगी प्रवासही रद्द करावा लागतो. यातून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी वेटिंग लिस्टचे तिकिट कन्फर्म झाले नाही तर त्याच मार्गावर इतर रेल्वेने प्रवाशांना प्रवास करता येणे लवकरच शक्य होण्याची शक्यता आहे. तसेच नव्या रेल्वेमध्ये प्रवाशांना वेटिंग लिस्टच्या तिकिटावरच आसनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave a Comment