फिलिप्सचे दोन नवे स्मार्टफोन लाँच

philips
फिलिप्स इंडियाने भारतीय मोबाईल बाजारपेठेत दोन नवे स्मार्टफोन सादर केले आहेत. झेनियम १९०८ हा फ्लॅगशीप फोन तसेच एस ३०९ हा बजेट फोन आहे. त्यांच्या किंमती अनुक्रमे ११७९९ व ४९९९ अशा आहेत.सार्क फिलिप्स कंट्री मॅनेजर एस.एस. बस्सी या संदर्भात म्हणाले की झेनियम टेक्नॉलॉजीसह आलेल्या या दोन्ही फोनचे बॅटरी लाईफ फारच चांगले आहे.

फ्लॅगशीप झेनियम १९०८ची जाडी केवळ ८.८ मिमी आहे. त्याला २ जीबी रॅम,१६ जीबी इंटरनल मेमरी, ५ इंची फुल एचडी स्क्रीन, १३ एमपी रियर व ५एमपी फ्रंट कॅमेरा, हाय क्वालिटी सेल्फीसाठी ८८ डिग्रीचा वाईड अँगल दिला गेला आहे.

बजेट फोन एस ३०९ साठी ४ इंची स्क्रीन, ५ एमपीचा रियर तर ०.३ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ४ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्डने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे.

Leave a Comment