
इटालीतील छोटासे गाव सेलिया. येथील मेअर डेव्हीड जिच्चीनेका यांनी गावातील कुणाही नागरिकांनी आजारी पडायचे नाही असे आदेश जारी केले आहेत. अर्थात यासाठी ते स्वतः नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे असे प्रयत्न करणार आहेत. विशेष म्हणजे मेअरचा हा आदेश सरकारी कर्मचार्यांनीही गंभीरपणे घेतला आहे. गेले काही महिने घरे, बाजार, शाळा, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यावर विशेष लक्ष दिले जात असून या जागा स्वच्छ राखणे बंधनकारक केले गेले आहे.
सेलियात नागरिकांना आजारी पडण्यास बंदी
नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छतेबाबत नागरिकांत सतत जागरूकता जागी करत आहेत आणि गावातील डॉक्टरही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. कुणाही नागरिकांना किंचितसे बरे नसले तरी त्याच्यावर त्वरीत उपचार केले जात आहेत. जागोजागी आरोग्य शिबिरे भरविली जात आहेत आणि या शिबिरात येणार्यांना करात सवलती दिल्या जात आहेत. नियमित आरोग्य तपासण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत आणि हा नियम जे पाळणार नाहीत त्यांच्याकडून जादा कर वसुल केला जात आहे असेही समजते.
मेयर डेव्हीड हे स्वतः डॉक्टर आहेत. ते म्हणतात आमच्या गावची लोकसंख्या कमी होत चालली आहे आणि ती काळजीची बाब आहे. त्यामुळे कुणीही नागरिक आजारी पडून मरण पावला असे होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. इटलीतील अनेक गांवात लोकसंख्या घट हा गंभीर प्रश्न बनला आहे. तरूण नोकर्या शिक्षणाच्या मिमित्ताने शहरांकडे धावत आहेत. सिसिलीच्या गांजी गावात तर बाहेरून येणार्या लोकांना रिकामी पडलेली घरे राहण्यासाठी मोफत दिली जात आहेत असेही समजते.
