डॉलरच्या तुलनेत ४८ पैशांनी घसरला रुपया

rupee
मुंबई – बुधवारी पाचव्या सत्रातही गेल्या चार सत्रात सुरु असलेली रुपयाची घसरण कायम राहिली. डॉलरच्या तुलनेत रुपया ४८ पैशांनी घसरला असून तो ६४.६७ रुपयांवर पोहोचला आहे.

रुपयामध्ये सप्टेंबर २०१३ नंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. चीनने युआन या चलनाचे मूल्य घटवल्याने चलन बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम रुपयावर होत आहे. मंगळवारीही डॉलरच्या तुलनेत रुपयाने दोन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. रुपयाने डॉलरसमोर ३९ पैशांनी अवमूलन दर्शवत तो ६४.२९ वर बंद झाला.

Leave a Comment