मर्सिडीजची एस ६३ एएमजी लाँच

mercedese
मर्सिडीज बेंझने त्यांची लक्झरी कार एस ६३ एएमजी भारतात लाँच केली असून तिची किंमत आहे २ कोटी ५३ लाख रूपये. कंपनीने यावर्षात नवीन १५ उत्पादने सादर करण्याचा वादा केला होता त्यातील हे दहावे उत्पादन आहे.

मर्सिडीजच्या या गाडीलाही त्यांच्या अन्य कारप्रमाणेच दणकट इंजिन दिले गले आहे यामुळे ० ते १०० किमीचा वेग घेण्यास या कारला अवघी ४.४ सेकंद लागतात. कारचा टॉप स्पीड २५० किमी पर अवर आहे. कारला २० इंची एएमजी टायटेनियम अॅलॉय व्हील्स दिली गेली आहेत. केबिनला स्पोर्टी लूक दिला आहे आणि त्यात इलेक्ट्रीकल अॅडजस्टमेंट व हिटींग फंक्शन बरोबर एएमजी स्पोर्टस सीटसही दिल्या गेल्या आहेत. डयुअल एअरबॅग्ज, नाईट सिक्युरिटी इल्युमिनेशन, स्मार्ट की, अटेंशन असिस्ट व एएमजी स्पोर्टस स्टीअरिंग असे या कारचे अन्य फिचर्स आहेत.