प्रिन्स चार्लस- डायना विवाहाच्या फोटोंचा लिलाव

prince
लंडन- ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्लस आणि लेडी डायना स्पेन्सर यांच्या विवाहप्रसंगाचे सुमारे १४ फोटो लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात येत आहेत. हे फोटो कुठेही प्रसिद्ध झालेले नाहीत. चार्लस डायना यांच्या विवाहाला ३० वर्षांचा कालावधी लोटला आहे. यातील कांही फोटो कृष्णधवल तर कांही रंगीत आहेत. या फोटोंच्या विक्रीतून १८ हजार डॉलर्सची रक्कम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रिन्स चार्लस आणि लेडी डायना यांचा विवाह २९ जुलै १९८१ रोजी झाला होता. लिलावासाठी असलेले फोटो इंग्लंडचा फोटोग्राफर पॅट्रीक लिचफिल्ड याच्या सहकार्‍याच्या संग्रहातील आहेत. या विवाहानिमित्त बकींगहॅम पॅलेस येथे झालेल्या स्वागतसमारंभाचे हे फोटो फारच थोड्या जणांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. मात्र ते कुठेही प्रसिद्ध झालेले नाहीत. २४ सप्टेंबरला बोस्टन येथे आरआर ऑक्शनर्स तर्फे त्यांचा लिलाव केला जाणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment