शिओमीचा रेडमी प्राईम पहिला मेड इन इंडिया फोन

xiaomi
चीनी मोबाईल कंपनी शिओमीने त्यांचा पहिलावहिला मेड इन इंडिया स्मार्टफोन सादर केला असून रेडमी प्राईम हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. ६९९९ रूपये किमतीचा हा स्मार्टफोन विशाखापट्टणम येथील उत्पादन प्रकल्पात तयार करण्यात आला असून तो स्नॅपडील, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट व मी डॉट कॉम या साईटवर उपलब्ध आहे. तैवानच्या फॉक्सकॉन मोबाईल फोन उत्पादन कंपनीने शिओमीसाठी हा फोन भारतात तयार केला आहे.

भारतीय बाजारात मोबाईल व्यवसायासाठी असलेल्या विपुल संधी लक्षात घेऊन गेल्यावर्षीच कंपनीने मेड इन इंडिया योजनेअंतर्गत विशाखापट्टणम येथे ऑपरेशन्स सुरू केली होती. ही कंपनी चीनबाहेर ब्राझील मध्ये उत्पादन करते त्यात आता भारताची भर पडली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष हुगो बरा म्हणाले की श्रीसिटीतील आमच्या प्रकल्पात रेडमी प्राईमची असेंब्ली केली गेली आहे आणि त्यापाठोपाठ अन्य उत्पादनेही येथे तयार केली जाणार आहेत. फेब्रुवारीत या प्रकल्पासंदर्भात चर्चा सुरू झाली होती आणि आता उत्पादन सुरू झाले आहे.

रेडिमी प्राईमसाठी २ जीबी रॅम, व १६ जीबी मेमरी दिली गेली आहे.

Leave a Comment