मंगळावर लांब केसांच्या महिलेचे दर्शन

mangal
नासाच्या रोव्हरने नुकत्याच पाठविलेल्या मंगळावरील फोटोत एका खडकावर लांब केसाची महिला पाहिल्याचा दावा केला जात असून त्यासंदर्भात ट्विटरवर खूपच मनोरंजक ट्विटही केली जात आहेत. कांही दिवसांपूर्वी मंगळावरच्या खडकात खेकडा दिसत असल्याचे फोटो असेच चर्चेचा विषय ठरले होते.ही महिला पाठमोरी असल्याने एलियन सारखी दिसते की सुंदर आहे हे समजायला मात्र मार्ग नाही.

नासाचे रोव्हर मंगळ ग्रहावरील अनेक फोटो पृथ्वीवर पाठवत आहे आणि त्यातून वैज्ञानिकांना अत्यंत महत्त्वाची माहितीही मिळत आहे. मात्र नासाने प्रसिद्ध केलेल्या कांही फोटोतून जगभरातील प्रेक्षक स्वतःही कांही शोध लावत आहेत आणि त्याची जोरदार चर्चा ट्विटरवर करत आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोटोत अगदी खडबडीत जमिनीवरच्या एका खडकावर पाठमोरी लांब केसांची महिला पायघोळ कपडे घालून उभी असल्याचा असाच जावई शोध लावण्यात आला आहे. यूएफओ सायटिंग डेली प्रमुखाने ब्लॉगवर या महिलेची डिटेल माहितीही दिली असून ही महिला रोव्हरला आमच्या प्रदेशातून ताबडतोब निघून जा असे बजावत असल्याचे म्हटले गेले आहे.

1 thought on “मंगळावर लांब केसांच्या महिलेचे दर्शन”

  1. बहुतेक मंगळागौर खेळत असावी एकटीच …………….

Leave a Comment