ट्रायच्या अध्यक्षपदी रामसेवक शर्मा

ramsewak-sharma
नवी दिल्ली – झारखंड कॅडरच्या १९७८ मधील आयएएस तुकडीचे रामसेवक शर्मा यांनी भारतीय दूरसंपर्क नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असून ग्राहकांना चांगली व अखंडित सेवा देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १४ मे रोजी राहुल खुल्लर सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते.

शर्मा पुढे म्हणाले की, आपण पदाची सूत्रे स्वीकारली असून प्राधिकरणाशी संबंधित सर्वच मुद्यांवर आपण आधी सहकारी सदस्यांशी चर्चा करू व नंतर योजावयाच्या आराखड्याला अंतिम रूप देणार आहोत.

Leave a Comment