वारंवार तळणी करूनही आरोग्यपूर्ण राहणारे तेल

cooking
तळलेले पदार्थ आवडत नाहीत अशी व्यक्ती जगाच्या पाठीवर सापडणे अवघड आहे. चमचमीत, चटकदार खाद्यपदार्थ जरा अधिक खाल्ले जातात मात्र ते तळण्यासाठी एकच तेल वारंवार वापरले जात असेल तर असे पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. यावरही आता संशोधकांनी उपाय शोधला आहे. एकच तेल ८० वेळा तळणीसाठी वापरले तरीही आरोग्यास त्याचा कांहीही अपाय होणार नाही असे तेल मलेशियातील संशोधकांनी तयार केले आहे.

पाम ऑईल व रूटेसी या वनौषधीचा रस यापासून हे तेल तयार केले गेले आहे. पुत्रा विश्वविद्यालयातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे आणि या तेलाचे वैज्ञानिक नामकरण एएफहीएचएल असे केले गेले आहे. या तेलात तळलेल्या पदार्थ अन्य तेलांच्या तुलनेत ८५ टक्के कमी तेलकट बनतो. त्यामुळे हदयविकाराचा धोका कमी होतो.

या तेलातील रूटेसी ही वनौषधी नैसर्गिकच अँटी ऑकिसडंट आहे यामुळे हे तेल तळण्यासाठी वारंवार वापरले गेले तरी ते खराब होत नाही. यात अँटी बॅक्टीरियल, अॅलर्जीबासून बचाव करण्याचे गुणही आहेत. या तेलात तळलेल्या पदार्थाचा स्वाद तेल वारंवार तापविलेले असले तरीही कायम राहतो आणि पदार्थ खराब होऊन वासही येत नाही. पदार्थ तळताना केवळ १५ मिमि तेलाचा सर्वसामान्यपणे वापर होतो तसेच हे तेल कॅन्सरचा धोका कमी करणारे असल्याचे सिद्ध झाले आहे असे संशोधिका सुहेला मोहम्मद यांनी सांगितले.

Leave a Comment