भारतात वृत्तपत्रांची संख्या वाढतीच

news
जगभरात प्रिंटेड वृत्तपत्रांची संख्या रोडावत चालली असताना भारतात मात्र राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पातळीवरील वृत्तपत्रांची संख्या दिवसेनदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. भारतात सध्या १.०५.४४३ वृत्तपत्रे नोंदणीकृत आहेत. हाच आकडा २०१३ साली ९४०६७ इतका होता.

मोबाईल इंटरनेटवर वृत्तपत्रे वाचायला मिळत असल्याने तसेच विविध वृत्तवाहिन्यांमुळे छापील वृत्तपत्र व्यवसाय अडचणीत सापडल्याचे चित्र जगभरात दिसत आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे अनेक नामवंत वृत्तपत्रे बंद पडतानाही दिसून येत आहे.भारतात मात्र हे चित्र उलट दिसते आहे. सर्वाधिक नोंदणीकृत वृत्तपत्रे प्रकाशित करण्याचा विक्रम उत्तर प्रदेशने केला आहे. तेथे २०१३ मध्ये १४३३६ वृत्तपत्रे होती तर हाच आकडा २०१५ मार्चमध्ये १५२०९ वर गेला आहे. महाराष्ट्र दोन नंबरवर असून तेथे ही संख्या १२४६६ वरून १४३९४ वर गेली आहे. दिल्लीत मार्च २०१५ पर्यंत १२१७७ नोंदणीकृत वर्तमानपत्रे आहेत तर आंध्रासह बहुतेक राज्यातही ही संख्या गतवेळच्या तुलनेत अधिक आहे.

नव्यानेच स्थापन झालेल्या तेलंगाणामध्ये सध्याच २०३ वृत्तपत्रे आहेत. लक्षद्विप, नागालँडमध्ये या संख्येत बदल झालेला नाही. तेथे अनुक्रमे ७ व २२ नोंदणीकृत वृत्तपत्रे आहेत.

Leave a Comment