गोव्यात सुरू होणार पहिली अँफिबियन बस सेवा

goabus
पाणी आणि रस्ते दोन्हीवर सहजतेने चालू शकणारी बस गोव्यात ऑगस्टअखेरीपासून सुरू होत आहे. यामुळे गोव्याला भेट देणार्‍या पर्यटकांना सुटीचा खराखुरा आनंद लुटणे शक्य होणार आहे. परिणामी सुंदर समुद्र आणि किनारे, स्वच्छ सूर्यप्रकाश, सात नद्या, संगीत, विविध खाद्यप्रकार यासाठी पर्यटकांच्या प्रथम प्राधान्यावर असणारे गोवा अॅंफिबियन बससेवेमुळे अधिक लोकप्रिय होईल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

अॅटोमोबिल कार्पो. ऑफ गोवा लिमिटेड व टाटा ग्रुप कंपनीने या बसच्या उत्पादनास हातभार लावला असून त्यांनी अॅफिबियस डिझाईन इंडिया प्रायव्हेट लिमि. या यूएस अॅडव्हान्स्ड अंम्फिबियस डिझाईन कंपनीशी संलग्न असलेल्या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. ३२ लोक प्रवास करू शकतील अशा या बस असून त्यांची किमत प्रत्येकी २ कोटी रूपये आहे. सुरवातीच्या काळात अशा दोन बस पुरविल्या जात असून वर्षअखेर सहा बसेस पुरविल्या जाणार आहेत.

रस्त्यांवर तसेच पाण्यातूनही चालू शकणार्‍या या बसेस जगात बाल्टीमोर, ऑस्टीन, वॉशिग्टन या शहरातून पूर्वीच लोकप्रिय झालेल्या आहेत. ही बस रस्त्यांवर ताशी ९४ किमी वेगाने तर पाण्यात ८ नॉटिकल वेगाने प्रवास करू शकते. अॅंफिबियन टूर्सचे संचालक कार्लोस डिझूझा म्हणाले की गोवा पर्यटन विभागाने त्यांना १० वर्षांसाठीचे कंत्राट दिले आहे. या गोवा दर्शन बससेवेत अभयारण्ये, जंगलसफारी, चर्च, स्मारके अशी सर्व सहल घडू शकणार आहे. गाडीचे आयुष्यमान १५ ते २० वर्षांचे आहे आणि बसमध्ये केलेली गुंतवणूक ३ वर्षातच निघू शकणार आहे असे समजते.

Leave a Comment