अॅड्राईड एम ओएसचे दोन स्मार्टफोन एकाचवेळी येणार

android
गुगल या वर्षात प्रथमच एकाचवेळी दोन नेक्सस स्मार्टफोन लाँच करणार आहे. टेक्नोवेबसाईट गिझ्मोमधील माहितीनुसार गुगलच्या आगामी अँड्राईड एमचा वापर केलेले हे दोन फोन दोन वेगळ्या कंपन्यांचे आहेत. कोरियन एलजी व चिनी वावे या त्या दोन कंपन्या आहेत. गुगलची ही ऑपरेटिंग सिस्टीम फ्री आहे असेही समजते.

एलजीचा नेक्सस फाईव्ह हा स्मार्टफोन ५.२ इंची स्क्रीन,४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज व ब्ल्यू टूथ ४.२, वायफाय,एनएफसी कनेक्टीव्हीटी ऑप्शनसह असेल. त्याला १३एमपीचा रियर कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन, लेजर ऑटोफोकस, ड्युल टोन एलईडी फ्लॅशसह दिला जाईल तर फ्रंट कॅमेरा ४ एमपीचा असेल. फिंगरप्रिट सेन्सर, स्टीरिओ स्पिकर, रियर फ्लॅश्ड पॉवर बटण अशी त्याची अन्य फिचर्स असून तो १९ ते २५ हजार रूपयांत उपलब्ध केला जाईल असे समजते.

वावेच्या स्मार्टफोनबाबत मात्र अधिक माहिती दिली गेलेली नसली तरी त्याला ५.७ इंची स्क्रीन, मेटल युनिबॉडी डिझाईन, २१ एमपीचा रियर कॅमेरा, वायरलेस चार्जिंग सुविधा असेल असे समजते. हे दोन्ही फोन आक्टोबर अथवा नोव्हेंबरमध्ये लाँच होतील.

Leave a Comment