चिमुकला महापौर जेम्स टफ्स

mayor
जगातल्या सर्वात चिमुकल्या महापौराला भेटायचे असेल तर आपल्याला अमेरिकेच्या मिनेसोटा मधील डोरसेट या चिमुकल्या गावाला भेट द्यायला हवी. येथे जेम्स टफ्स या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाची महापौर म्हणून नुकतीच निवड केली गेली आहे. विशेष म्हणजे जेम्सचे दुधाचे दातही अद्याप पडलेले नाहीत. महापौरांनी त्यांना निवडून देणार्‍या मतदारांना आईस्क्रीमची पार्टीही दिल्याचे समजते.

मिनेसोटा राज्यातील या चिमुकल्या डोरसेट गावात फक्त २२ लोक राहतात. दरवर्षी येथे डोरसेट महोत्सव साजरा केला जातो आणि त्यावेळी येथील नागरिक त्यांच्या पसंतीच्या एकाला मतदान करून त्याची महापौर म्हणून निवड करतात. या गावात सरकारी अधिकृत अशी कोणतीही व्यवस्था त्यासाठी नाही. यापूर्वी जेम्सचा ६ वर्षाचा भाऊ या गावाचा महापौर होता व त्याने महापौर म्हणून दोन टर्म पूर्ण केल्या आहेत.

हे चिमुकले आणि हातावर मोजता येणारी लोकसंख्या असलेले गाव प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून या सुंदर गावाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात असेही समजते.

Leave a Comment