अॅपल सीईओ कुकच्या सुरक्षेवर ५ कोटी खर्च

tim
जगातील सर्वात मोठी टेक कंपनी अॅपल चे सीईओ टीम कुक यांच्या संरक्षणासाठी कंपनीने वर्षात ५ कोटी रूपये खर्च केले असल्याचे फोर्ब्स, इक्विलर व द रिचेस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून समोर आले असून ही रक्कम भारताचे यशस्वी आणि सर्वात मोठे उद्योगपती रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेपेक्षा तब्बल ३ कोटींनी जास्त आहे.

अर्थात कुक यांच्यावर सुरक्षेसाठी खर्च केली गेलेली रक्कम अॅमेझॉन, डेल व ओरॅकल या कंपन्यांच्या सीईओंपेक्षा कमीच आहे. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांच्या सुरक्षेवर साडेसात कोटी, ओरॅकलचा सीइओ लॅरि इलिसन यांच्या सरक्षेवर १०.७ कोटी तर डेलचा संस्थापक माईक डेल यांच्या सुरक्षेवर साडेसात कोटी रूपये खर्च केले आहेत. मुकेश अंबानी यांना झेड प्लस सुरक्षा असून त्यासाठी वर्षाला दोन कोटी रूपये खर्च केले आहेत.

ओरॅकलचा सीईओ लॅरि इलिसन याच्याकडे ४० अब्ज डॉलर्सची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्या सुरक्षेसाठी छोटे सैन्यच नियुक्त केले गेले आहे. इलिसनची सुरक्षा ही सर्वात महाग व अत्याधुनिक सुरक्षा असल्याचेही सांगितले जाते. टीम कुकच्या सुरक्षेसाठी इतका खर्च करण्यामागेही कांही कारणे आहेत. अॅपलची मार्केट व्हॅल्यू ४८ लाख कोटींची असून त्यांच्याकडे १३ लाख कोटींची कॅश आहे. अॅपल स्टोअर्सची २०१४ ची कमाई २५ अब्ज डॉलर्स असून दररोज कंपनी ५.१० लाख आयफोनची विक्री करते आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment