आता ऑनलाईन करा मंगळ ग्रहाची सफर

nasa
वॉशिंग्टन : आता नेटकरांना ऑनलाइन मंगळ ग्रहाची सफर घडणार असून क्युरिऑसिटी रोव्हर या मंगळ यानाच्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने (नासा) हा निर्णय घेतला आहे. यानाने केलेला मंगळप्रवास त्यामुळे अनुभवता येईल. मुख्य म्हणजे यामुळे नवोदित संशोधक, विद्यार्थी आणि जिज्ञासूंना हा खजिना

उपलब्ध होणार आहे. ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ मंगळाची अद्भूत सफर केली आहे. त्यातून ‘नासा’ कडे मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे व माहिती संकलित झाली आहे. शिवाय ५० वर्षांतील अन्य यानाच्या मदतीने मिळालेली माहितीही ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘मार्स ट्रेक’ हे वेबबेस्ड अ‍ॅप्लिकेशन असून, ते नेटकरांना विनामूल्य उपलब्ध असेल. मंगळावर पहिली मानवी मोहीम २०३०मध्ये आखली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांची नोंदणी करण्यासाठी व अन्य माहितीची आदानप्रदान करण्यासाठी ‘मार्स ट्रेक’ चा वापर सध्या केला जातो.

Leave a Comment