१.६ लाख किलोमीटर अंतरावरुन नासाने टिपली चंद्राची डार्क साईड

nasa
वॉशिंग्टन : नासाने पहिल्यांदाच चंद्राचा अनोखा व्हिडिओ जाहीर केला असून डीप स्पेस क्लायमेट ऑब्जव्र्हेट्री सॅटेलाईटच्या कॅमे-यात चंद्राचे फोटो घेण्यात आले आहे. याचा व्हिडिओही रेकॉर्ड करण्यात आला आहे. याला ‘डार्क साइड ऑफ द मून’ असे नाव देण्यात आले आहे. पृथ्वीची परिक्रम पूर्ण करीत असताना १.६ लाख किलोमीटर दूर अंतरावरुन फोटो घेण्यात आल्याचे नासाने सांगितले आहे. चंद्राची ही बाजू पृथ्वीवरुन कधीही बघण्यात आलेली नाही.
चंद्र जेव्हा पृथ्वीची परिक्रमा करीत होता तेव्हा गेल्या महिन्यात हे फोटो आणि व्हिडिओ घेण्यात आला. यावेळी पृथ्वीच्या रोटेशनवर बारीक नजर ठेवण्यात आली होती. ओझोन आणि अ‍ॅडमॉसस्फिअर यासंदर्भात शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. पॅसेफिक ओशनपासून उत्तर अमेरिकेकडे चंद्र जात असताना हे फोटो टिपण्यात आले आहेत.

Leave a Comment