एअरटेलची फोर जी सेवा देशभरात लाँच

airtel
एअरटेलने बंगलोर आणि दिल्लीनंतर आता देशभरात फोर जी सेवा लाँच केली आहे. देशभरात ही सेवा सुरू करणारी एअरटेल ही पहिली कंपनी आहे. कंपनीने थ्रीजी च्या दरातच ही सेवाही युजरसाठी उपलब्ध करून दिली आहे.

युजरला एअरटेल फोर जी कनेक्शन सपोर्ट करू शकेल असे सिम कार्ड त्यासाठी वापरावे लागणार आहे. सिम कार्ड बदलाची प्रक्रिया कंपनीने अतिशय सोपी केली असून १० मिनिटात सिम कार्ड स्वॅप करता येणार आहे आणि नवीन सिम कार्ड चार तासात घरपोच दिले जाणार आहे. या सेवेबरोबरच कंपनीने विंक नावाचे अॅपही लाँच केले आहे. यामुळे युजरला मूव्ही व व्डिडीओ पाहता येतील. डाऊनलोड करता येतील व नंतर ऑफ लाईनही पाहता येतील.

कंपनीने युजरला इनफिनिटी प्लॅन दिले असून त्यामुळे अनलिमिटेड कॉल्स करता येणार तसेच डेटा जादा मिळणार असला तरी कंपनीने अनलिमिटेड डेटा प्लान दिलेला नाही. या सेवेसाठी फोनची बॅटरी जादा वापरली जाणार आहे.

Leave a Comment