मंगळावरच्या खेकड्याची चौकशी करा; नासाने केली मागणी

mars
वॉशिंग्टन : अनेक संशोधकांनी यापूर्वी मंगळावर पाणी, जीवसृष्टी असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा केला असून आता याच मंगळावर ‘खेकडा’ पाहिला असल्याचा अजब दावा काही तज्ज्ञांनी ‘एलियन्स’ चा शोध घेणा-या एका बेवसाइटवर अशा प्रकारचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर केला आहे. या छायाचित्रात मंगळावरील विशाल खडकाच्या मध्यभागी खेकड्यासारखी आकृती दिसत आहे. हा परग्रहावरील जीव असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.

१९८० च्या दशकात आलेल्या ‘एलियन’ या अमेरिकन चित्रपटात अशाच प्रकारचा परग्रहावरील जीव दाखवण्यात आला होता. मंगळावरील मार्स क्युरिऑसिटी रोव्हरद्वारे घेण्यात आलेल्या या छायाचित्राची चौकशी ‘नासा’ मार्फत करायला हवी, अशी तज्ज्ञांची मागणी आहे. पण छायाचित्रात खेकड्यासारखी दिसत असलेली आकृती खडकाचा एक छोटासा तुकडा आहे. तो खेकडा अथवा एलियनही नाही, असे सांगत संशोधकांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मंगळावर जीवसृस्टी आहे किंवा नाही याबाबत अदयापही ठोस असे पुरावे संशोधकाच्या हाती लागले नाहीत.

Leave a Comment