उठा, अन्यथा हा बेड तुम्हाला देईल फेकून

bed
गरज वाजूनही ज्यांची झोप मोडत नाही अशा आळशी लोकांना जागे करण्यासाठी ब्रिटीश शोधकर्ता कॉलीन फुर्ज याने एक अनोखा बेड तयार केला आहे. या बेडवर झोपणारी व्यक्ती अगदी कुंभकर्णाची भाऊबंद असली तरीही ती हमखास जागी होणारच असा कॉलीनचा दावाही आहे. या बेडमुळे आळशी लोकांची झोप उडेल असाही त्याचा दावा आहे.

वेळेवर उठण्याचे महत्त्व सर्वांनाच मान्य असते. त्यासाठी वेळेवर जाग यावी म्हणून गजर लावला जातो मात्र अनेकजण गजर वाजला की तो बंद करून पुन्हा झोपी जातात. असल्या आळशी लोकांसाठी कॉलीनने बनविलेला बेड फारच उपयुक्त ठरणार आहे. अॅल्युमिनियमपासून हा बेड बनविला गेला असून त्याला २ एअर काँप्रेसर, २ पिस्टन, सेंसर व घड्याळ बसविले गेले आहे. सेट केलेल्या वेळेपूर्वीच याचा गजर होणार आहे मात्र तरीही उठायचा आळस केलाच तर या बेडची सिस्टीम सक्रीय होऊन झोपणार्‍या व्यक्तीला हवेत उडवून देणार आहे. हाय व्होल्टेज इंजेक्टर बेड असे त्याचे नामकरण केले गेले आहे.

Leave a Comment