
मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी युएस फेडरल रिजर्व्हच्या प्रस्तावित व्याजदर वाढीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विशेष परिणाम होण्याची शक्यता नाकारली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवर फेडरल रिजर्व्हच्या दरवाढीचा परिणाम नाही – रघुराम राजन
परदेशी सरकारी कर्जाच्या व्याज दरात युएस फेडरल बँक वाढ करणार असल्याचे संकेत मिळत आहेत हे धोरण निश्चित होईपर्यंत वाट पाहण्याची गरज आहे का ? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर रघुराम राजन यांनी व्याज दरात वाढ झाली तरी त्याचा काही विशेष परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे. मुंबईमध्ये आयोजित एका चर्चासत्रात त्यांना चिकित्सक म्हणून मार्गदर्शन करण्याकरिता बोलविण्यात आले होते. यावेळी राजन यांनी, परदेशात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींवर अवलंबून भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांना थांबविणे शक्य नसल्याचे सांगितले. फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरपासून नक्कीच त्यांच्या शून्य व्याज दरामध्ये वाढ करण्याची शक्यता असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
