कलाम यांचे ट्विटर अकाऊंट बंद

kalam
बंगलोर : ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट सांभाळण्याबाबत झालेल्या वादानंतर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे ट्विटर अकाऊंट अखेर बंद करण्यात आले आहे.

सृजन पाल सिंह आणि डॉ. कलाम यांच्या कार्यालयामध्ये सोशल प्लॅटफॉर्मवरील डॉ. अब्दुल कलाम यांचे ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट कोण सांभाळणार यावरुन वाद झाला होता.

एक परिपत्रक काढून डॉ. कलाम यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, डॉ. कलाम यांच्या शैक्षणिक कामांमधील सहकारी सृजन पाल सिंह यांनी मीडिया तसेच सोशल प्लॅटफॉर्मवर कलाम यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य करु नये. सृजन पाल सिंह यांना सुरुवातीलाच सल्ला दिला होता की, माजी राष्ट्रपतींच्या नावाशी संबंधित किंवा त्यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले सर्व फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट तातडीने बंद करावेत, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

तर सृजन पाल सिंह यांचे असे म्हणणे आहे की. मी केवळ माझे वैयक्तिक अनुभव शेअर केले आहेत. डॉ. कलाम हयात असताना त्यांनी सोशल नेटवर्किंग साईटवरील त्यांचे अकाऊंट सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्याचबरोबर डॉ. कलाम यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. अनेक वर्ष सोबत राहिल्याने डॉ. अब्दुल कलाम यांनी अनेक गोष्टी शेअर केल्या, ज्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही.

Leave a Comment