अक्षय कुमारच्या हस्ते साडेसात लाखांची होंडा लाँच

akshay
नवी दिल्ली- होंडाने सीबीआर ६५०एफ, सीबीआर १५० आर, सीबीआर २५०, हॉर्नेट १६० आर या गाड्या कंपनीने लाँच केल्या. अक्षय कुमारच्या हस्ते या कार्यक्रमात गाड्या रेव्ह फेस्ट या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या.

६४९ सीसी इंजिन, लिक्विड कुल्ड, ४ लाइन सिलेंडर, १६ व्हॉल्व, ६ स्पीड गिअरबॉक्स ही वैशिष्ट्ये असणाऱ्या सीबीआर एफ बाइकची किंमत साडे सात लाख रुपये आहे. या गाडीमध्ये डीजीटल स्पीडोमीटर आहे, केएम काउंटर, टू ट्रिप मीटर, बार टॅकोमीटर आणि फ्युएल गॉज आहेत. होंडा सीबीआर १५० आर आणि होंडा सीबीआर २५० आर यांच्यामध्ये अतिशय कमी बदल झाले आहेत. थोड्या बदलासह कंपनीने या गाड्या लाँच केल्या आहेत. तर, सीबीआर ६५० एफ आणि सीबी हॉर्नेट १६० आर या दोन नव्या गाड्या होंडाच्या पोर्टफोलियोमध्ये सामील झाल्या आहेत.