दत्तक घेण्यासाठी मुलींची जाणवतेय चणचण

adoption
केंद्र सरकारने दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे चांगलीच उपयुक्त शाबीत झाली आहेत. देशात सध्या दत्तक घेण्याच्या प्रमाणात चांगलची वाढ झाली आहे मात्र दत्तक घेऊ इच्छिणार्‍या बहुतेक पालकांनी मुलींना प्राधान्य दिले असल्याचे आशादायी चित्र दिसत असले तरी मुली दत्तक मिळणे अवघड बनले असल्याचेही दिसून येत आहे.

भारतात स्त्री भ्रूण हत्येचे लक्षणीय प्रमाण व त्यामुळे स्त्रीपुरूष रेशोमध्ये होत असलेली चिंताजनक घट या पार्श्वभूमीवर दत्तक घेताना मात्र मुली मिळत नाहीत हे चित्र म्हणजे विरोधाभासच म्हणायला हवा असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. पालकांच्या अनुभवानुसार ज्यांना मुलगा मुलगी कुणीही चालणार आहे, त्यांना फारशी प्रतिक्षा न करता मुलेच दत्तक मिळत आहेत मात्र ज्यांना मुलगीच दत्तक घ्यायची आहे त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते आहे.

या मागे शिक्षणाचा प्रसार आणि शहरी पालकांत बदलत चाललेला ट्रेंडही कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. शहरी पालक स्वतःला मूल होत नाही म्हणून दत्तक घेताना दिसत नाहीत तर मुद्दाम मूल होऊ न देताही दत्तक घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यात सुरक्षित नागरिकांत भारतीयांत मुलाला अधिक प्राधान्य दिले जाणे आणि मुलींसोबत केला जात असलेला भेदभाव यासंदर्भातली जागृती झाली असल्याने हा वर्गही मुली दत्तक घेण्यास अधिक पसंती देत आहे असे समजते.

Leave a Comment