कुणालाही मिळू शकणार पेट्रोल पंपाची एजन्सी

petrol
पेट्रोल पंप उघडण्यासाठी आता सर्वसामान्य नागरिकही आपल्या पसंतीच्या ठिकाणी एजन्सी सुरू करू शकणार आहेत. त्यांना आता यासाठीच्या लकी ड्रा मध्ये सामील होण्याची गरज नाही कारण कुणालाही पेट्रोल पंप घेता यावा या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत असून यामुळे या सेक्टरमध्ये मोठा बदल होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलपंप वाटपात होत असलेले घोटाळे कमी करण्यावर सरकारचा भर आहे.तसेच सरकारी इंधन कंपन्यांना इंधन सबसिडी रद्द झाल्यामुळे रिलायन्स, एस्सार या खासगी क्षेत्रातील कंपन्यांशी तगडी स्पर्धा करावी लागत आहे. या खासगी कंपन्या तेल वितरण व्यवसाय वाढीसाठी सज्ज झाल्या आहेत आणि सरकारी कंपन्या मात्र अनेक बंधनात अडकल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या आठवड्यातच इंडियन ऑईल कार्पो, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांचे प्रतिनिधी या संदर्भात चर्चा करणार आहेत.

नवीन प्रस्तावानुसार ज्याला पंपाची डिलरशीप हवी तो कुणीही नागरिक आता अर्ज करू शकेल.त्याने आवश्यक ती गुंतवणूक केली की त्याला लवकरात लवकर पंप दिला जाईल. या प्रस्तावामुळे खासगी कंपन्यांशी सरकारी कंपन्यांना स्पर्धा करण्यासाठी मोकळीक राहणार आहे. आत्तापर्यंत सरकारी एजन्सीसाठी अर्धे पंप बॅकवर्ड क्लाससाठी देण्याचे बंधन होते तसेच एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला ही एजन्सी घेता येत असे. अॅलोकेशन प्रक्रिया जटील होती व त्यात राजकीय हस्तक्षेपाचा संशयही घेतला जात असे. सरकारी कंपन्यांचे डिस्ट्रीब्युटरवर नियंत्रण नव्हते. ते सर्व अडथळे नवीन प्रक्रियेत दूर होऊ शकणार असल्याचे समजते.

4 thoughts on “कुणालाही मिळू शकणार पेट्रोल पंपाची एजन्सी”

Leave a Comment