मुंबई: आपल्या iOS आणि अँड्रॉईड यूजर्ससाठी नवे फीचर ‘न्यूज टॅब’ आणण्याच्या तयारीत सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटर आहे. या नव्या फीचरची चाचणी मोबाइल अॅपसाठी करण्यात आली असून न्यूज टॅबवर क्लिक केल्यानंतर ट्रेण्डिंगमधील असणाऱ्या बातम्या तुम्हाला पाहता येणार आहे.
लवकरच येणार ‘ट्विटर’चे नवीन फिचर
तुम्ही एखाद्या न्यूज अकांऊटला फॉलो करीत नसलात तरीही ट्रेण्डिंगमधील असणारी बातमी तुम्हाला या नव्या फिचरमुळे पाहाता येणार आहे. जास्तीत जास्त यूजर्सला सोप्या पद्धतीने माहिती मिळावी यासाठी या हे नवीन फीचर आम्ही आणले असून iOS आणि अँड्रॉईड यूजर्स याचा उपयोग करु शकतील अशी माहिती ट्विटरच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
‘न्यूज टॅब’मधील एका बातमीच्या लिंकवर क्लिक केल्यास फोटोसह तुम्हांला संपूर्ण बातमी पाहता येईल. सध्या या फीचरचे टेस्टिंग सुरु असून ते ग्लोबली लाँच करण्यात येणार असल्याचेही समजते आहे. मात्र हे फीचर नक्की कधी केलं जाणार याबाबत ट्विटरने अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.