वन प्लस कंपनीने त्यांचे दोन स्मार्टफोन नुकतेच लाँच केल्याला आठवडयाचा कालावधी लोटतो आहे तोवरच कंपनीने डिसेंबरपर्यंत नवा स्मार्टफोन बाजारात आणला जात असल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ कार्ल पाई यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत येत्या नाताळमध्ये कंपनी नवीन स्मार्टफोन बाजारात आणत असल्याचे सांगितले आहे.
या वर्षअखेरी येणार वन प्लसचा नवा फोन
पाई म्हणाले नवा स्मार्टफोन वनप्लस टू पेक्षा अधिक चांगला असेल की कमी असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र युजरला तो नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. कंपनीचे फोनसाठी फिटनेस ट्रॅकर बनविण्याची कल्पना ड्राॅप केल्याचे सांगून पाई म्हणाले की हा ट्रॅकर आम्ही जवळजवळ पूर्ण बनविला होता मात्र त्यावर पुढे काम करायचे नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.