मारुतीने सादर केली एस-क्रॉस कार

s-cross
नवी दिल्ली- मारुती सुझूकी इंडियाने बुधवारी एस-क्रॉस ही नवी कार भारतीय बाजारपेठेत दाखल केली असून या कारची किंमत ८.३४ लाख आणि १३.७४ लाख एवढी आहे.

कंपनीने ६०० कोटींची गुंतवणूक या कारच्या निर्मितीसाठी केली असून यासाठी चार वर्षांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. भारतामध्ये असा ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहे ज्यांना कारची स्टाइल आणि आरामदायकता हवी आहे, अशा ग्राहकांसाठी खास एस-क्रॉस ही कार उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही कार १.६ लीटर आणि १.३ लीटर डीझेल इंजिनच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. ही नवी कार ह्युंडाईची क्रेटा आणि रेनॉल्टची डस्टर या दोन एसयुव्हीची जागा व्यापते का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या कारला बरेच फीचर्स आहेत क्रुज कंट्रोल, ऑटो वायपर्स, सेल्फ अॅडजस्टिंग हायड्रोलिक ऑटो क्लच आणि रिअर सीट रिक्लायनर या गाडीमध्ये उपलब्ध आहेत.