निलयने केली जगातील सर्वात स्वस्त रोबोटिक आर्मची निर्मिती

nilay-mehta
न्यूयॉर्क- जगातील सर्वात स्वस्त रोबोटिक आर्मची १७ वर्षीय निलय मेहताने निर्मिती करीत ब्लू रिब्बन अॅवार्ड पटकाविला आहे. हा आर्म म्हणजे निलयचा सायन्स प्रोजेक्ट आहे. ऑरेंज काउंटी सायन्स अॅंड इंजिनिअरिंग फेअर सर्व्हिसेसमध्ये देखील त्याने आपला प्रोजेक्ट सादर केला होता.

निलय कॅलिफोर्नियातील आयर्विन पब्लिक स्कूलमध्ये शिकतो. हा रोबोटिक आर्म व्हॉइस कमांडवर चालतो. एका छोट्याशा माइकला हा आर्म जोडला गेलेला आहे. या हाताने तुम्ही काही वस्तू पकडू शकतात किंवा चिमटा देखील काढू शकतात. बाकी रोबोटिक आर्म्सची किंमत ३५,००० डॉलर्स आहे तर निलयने तयार केलेल्या हाताची किंमत २६० डॉलर्स आहे. या आर्मवर आणखी प्रयोग करून विविध सायन्स फेअरमध्ये सादर करण्याचा निलयचा विचार आहे.

Leave a Comment