रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट जैसे थे

rbi
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज आर्थिक वर्षातील तिसरे पतधोरण जाहीर केले असून यानुसार रेपो, रिव्हर्स रेपो आणि कॅश रिव्हर्स रेपो (सीसीआर) च्या दरांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे रेपो रेट ७.२५ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के असा कायम राहिला आहे.

व्याजदर कपातीची आशा बाळगलेल्या सर्वसामान्य नागरिकांची आरबीआयच्या या निर्णयामुळे निराशा झाली आहे. कारण सर्वसामान्यांच्या कर्जावरील मासिक हप्त्याच्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. यापूर्वी २ जूनला आरबीआयने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली होती. या वर्षभरात तीन वेळा व्याजदरात कपात झाली आहे.

Leave a Comment