सोनीने आणला १३ मेगापिक्सलचा मिडरेंज स्मार्टफोन!

sony
मुंबई: सोनीने मिडरेंज स्मार्टफोन मालिकेत दोन नवे हँडसेट लाँच केले आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात या दोन नव्या मॉडेल्सची विक्री सुरू होणार आहे. या मॉडेल्सची किंमतही सोनीने अजून जाहीर केलेली नाही. मात्र मिडरेंज असे आधीच जाहीर केल्यामुळे हे दोन्ही फोन बजेट फोन असण्याची शक्यता आहे. या दोन मॉडेल्सची नावे एक्स्पेरिया सी५ अल्ट्रा आणि एक्स्पेरिया एम५ अशी आहेत.

या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये सोनीने सेल्फी कॅमेऱ्याला खूप महत्व दिले आहे. एक्स्पेरिया सी५ अल्ट्रामध्ये फ्रंट म्हणजे सेल्फी आणि मुख्य म्हणजे रिअर कॅमेरा दोन्ही १३ मेगापिक्सेलचे आहेत. तसेच सी५ अल्ट्राचा डिस्प्ले सहा इंचाचा आहे. हा फोनही सोनीच्या अन्य मॉडेल्सप्रमाणेच वॉटरप्रूफ आहे.
सोनीने लाँच केलेल्या दुसऱ्या एक्सपिरिया एम५ या मॉडेलचा स्क्रीन डिस्प्ले ५ इंचाचाच असला तरी सेल्फी म्हणजे फ्रंट कॅमेरा १३ मेगा पिक्सेलचा आणि रिअर म्हणजे मुख्य कॅमेरा २१.५ मेगा पिक्सेलचा आहे. एक्सपिरिया एम५ या स्मार्टफोनच्या फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यातून सर्वसामान्यांनाही एखाद्या प्रोफेशनलप्रमाणे फोटोग्राफी करता येईल असा सोनीचा दावा आहे.

Leave a Comment