
नाशिक – आज सकाळी पुन्हा रॉकेटद्वारे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सायगाव येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला. सकाळी ढगांवर ३ रॉकेटचा मारा करण्यात आला. परंतु पाऊस पडला नाही.
शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; अयशस्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग
आकाशात पुन्हा रॉकेट सोडण्यात येणार होते पण परिसरात अचानक ऊन पडल्याने काही काळ प्रयोग थांबवण्यात आला. आता आकाशात ढग आल्यानंतरच या प्रयोगाल सुरुवात होणार आहे, अशी माहिती आयएसपीसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रविवारी देखील कृत्रिम पावसाचा नाशिकमध्ये प्रयोग करण्यात आला होता, मात्र यासाठी पोषक वातावरण दिवसभरात तयार न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.
