बँक कर्मचार्‍यांना आरोग्य विमा

health
बँकांतील सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाला आरोग्य विम्याचा लाभ मिळणारअसून सरकारी विमा कंपन्या व भारतीय बँक असोसिएशन मार्फत मास्टर मेडिक्लेम पॉलिसी जारी केल्या जाणार आहेत. ऑगस्ट अखेरीपर्यंत हे काम पूर्ण केले जात असून याचा लाभ १० लाख कर्मचारी अधिकारी वर्गाला मिळणार आहे. तसेच ३ लाख निवृत्तांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. बँकाकडून कर्मचार्‍यांसाठी आरोग्य विमा देण्याचा हा पहिलाच प्रसंग असून विम्याचा हप्ता बँकांतर्फे भरला जाणार आहे.

याअंतर्गत बँक कर्मचार्‍यांना ३ लाख रूपयांच्या विम्यासाठी ५ हजार रूपये हप्ता तर अधिकार्‍यांना ४ लाखाच्या विम्यासाठी ६ हजार रूपये हप्ता बसणार आहे. ही योजना ४३ बँकांत लागू होत आहे त्यात २५ सरकारी व ११ जुन्या खासगी बँकांचा तसेच ७ विदेशी बँकाचा समावेश आहे. बँक कर्मचारी संघटना व इंडियन बँक असो. सदस्यांनी या योजनेला संमती दर्शविली आहे. या विमा संरक्षणात लहान मोठ्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. युनायटेड इंडिया अॅशुरन्स या योजनेतली मुख्य विमा कंपनी असून बाकी ३ सरकारी कंपन्या सह विमा कंपन्या आहेत.

Leave a Comment