कूलपॅडचा डॅझन वन व एक्स सेव्हन लाँच

dazen
चीनी स्मार्टफोन कंपनी कूल पॅडने त्यांचे बजेट फोन डॅझन वन व डॅझन एक्स सेव्हन लाँच केले असून सब ब्रँड लेटस्ट डिव्हाईस डॅझन नोट थ्री फिंगरप्रिट स्कॅनरसह १० हजार रूपयांपेक्षाही कमी किमतीत सादर केले आहे. हे दोन्ही फोन सध्या चीनमध्ये सादर झाले आहेत.

भारतातील कंपनीचे सीईओ वरूण शर्मा म्हणाले की भारतात हे फोन सादर करण्यापूर्वी ते ३ जीबीला अपग्रेड केले जाण्याची दाट शक्यता आहे. या फोनसाठी ५.५ इंची स्क्रीन, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. फोनला १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा सीएमओएस सेंसरसह दिला गेला आहे. कनेक्टीव्हीटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, फोर जी, जीपीएस ऑप्शन आहेत. काळा आणि पांढर्याट रंगात ते सध्या उपलब्ध आहेत तसेच स्नॅपडीलवर ते ९३००रूपयांत चीनमध्ये उपलब्ध आहेत.

Leave a Comment