अँग्री बर्डस टू रिलीज

angri-birds
जगभरात मोबाईल गेम विश्वात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या रोवियो कंपनीच्या अँग्री बर्डस ची अॅडव्हान्स व्हर्जन अँग्री बर्डस टू नावाने लाँच करण्यात आली आहे. अँड्राईड व आयओएस ऑपरेटिंग सिस्टीम वर खेळता येणार्‍या या गेमचे फ्री डाऊनलोडिंग करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अँग्री बर्डसचे १५ विविध गेम्स रोविओने सादर केले.ते सर्वच लोकप्रिय ठरले .मात्र २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये या गेमची लोकप्रियता ओसरू लागल्याची जाणीव कंपनीला झाली आणि त्यांना ७३ टक्के नुकसानही सोसावे लागले. त्यामुळे पुन्हा नवीन व्हर्जनसह बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला गेला. या गेमला कसा प्रतिसाद मिळणार याची बाजाराला उत्सुकता आहे.

या गेममध्ये नवीन बर्डस, ट्रीकी लेव्हल्स व इन गेम ट्रिक्स आहेत. नवीन फिचर म्हणून फास्ट फॉरवर्ड बटण दिले गेले आहे. यामुळे गेमचा स्पीड वाढविता येणार आहे. इन गेम रिवॉर्डस, नवीन डायलॉग बॉक्स अॅड केले गेले आहेत. रिअॅक्शन फेसपण अॅड केले गेले आहे त्यामुळे गेमला कॉमिकल टच आला आहे. ग्राफिक्सही अतिशय सुंदर बनविले गेले आहेत असे समजते. मात्र हा गेम लोड करण्यासाठी युजरला जादा डेटा खर्च करावा लागणार आहे कारण गेम ६७ एमबी चा आहे.