भारतीय बाजारपेठेत मर्सिडिजची ‘डिझायनो’ दाखल

mercedes
नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठेत आलिशान मोटारींची निर्मिती करणाऱ्या जर्मनीतील मर्सिडिजने ‘डिझायनो’ श्रेणीतील तीन नव्या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मोटारी उतरविल्या आहेत. एएमजी एस ५००कूप, एएमजी एस ६३ कूप, एएमजी जी ६३ ‘क्रेझी कलर्स’ या मोटारींचा यात सहभाग असून एकाच वेळी तीन मोटारी बाजारात उतरविण्याची कंपनीची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय ग्राहकांची आवड ओळखून त्यांना आपल्या पसंतीची अंतर्गत रचना, हस्तकला निर्मित लेदरच्या सीट, गाडीचा रंग आदींची निवड करण्याची मुभाही याद्वारे मिळणार आहे. या आलिशान मोटारींपैकी एएमजी ६३ कूपे ही मोटार बहुप्रतीक्षित ‘मॅजिक बॉडी कंट्रोल’ प्रणालीयुक्त आहे. मॅजिक बॉडी कंट्रोल ही गाडीच्या सस्पेन्शनचा एक भाग असून यामध्ये उच्च प्रतीच्या कॅमेऱ्याद्वारे रस्त्याची पाहणी करून त्याअनुसार सस्पेन्शन जुळवून घेतो. यामुळे मोटार चालविण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच रस्त्याचे ४९ फुटांपर्यंत निरीक्षण करून तशा सूचना देते. एस ६३ कूपचे इंजिन व्ही-८ ट्विन टबरेचार्ज श्रेणीतील आहे. ही मोटार फक्त ४.२ सेकंदांत १० ते १०० किमीचा वेग घेत असल्याचा दावा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एबरहार्ड केर्न यांनी केला.

Leave a Comment